
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे दारू तस्करावर वडकी येथील दावत बार समोर दारू तस्करावर कार्यवाही करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यामध्ये दारुबंदी असल्यामुळे त्या ठिकाणी अवैध पद्धतीने यवतमाळ जिल्ह्यातून अवैध मार्गाने वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठा केला जातो. त्याच पद्धतीचा वडकी पोलिसांनी आरोपी विजेंदर तकदीर सिंग जुनी वय छत्तीस वर्ष यांची स्विफ्ट डिझायर वाहनाचे डिकीमध्ये HAYWARDS SOO PREMIUM STRORNG BEER 500 ML चे 48 नग प्रत्येकी 130/ रुपये प्रमाणे 6,240/- रूपये तसेच 180 ML. BLUE OFFICIAS. Chect चे 40 नग प्रत्येकी 150/ रुपये प्रमाणे 6,000/- रूपयचा तसेच स्विप्ट डिझायर क्र. एम. एच. 01 बि.टी. 7156 द किंमत 5,00,000/ रुपये असा एकुण 5, 12,240 / रूपयेचा दारु सह मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हे कारवाई वडकी पोलिस स्टेशन ठाणेदार विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात निलेश वाढई आणि विलास जाधव यांनी केलेली आहे.
