
तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय. पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळ व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. तणाव, दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे, वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंते यांचाही यात वाटा असू शकतो. अश्यातलाच एक प्रकार प्रेमाच्या विरहातून आत्महत्या केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे समोर आली आहे..
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की
देवळी तालुक्यातील वायगाव येथील सौरभ अनिल मस्के वय 21वर्ष याने येथीलच एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत फुसलावून पळून नेले होते. त्यावरून मुलीच्या वडिलांनी देवळी पोलीस ठाण्यात सौरभ विरुद्ध तक्रार देवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसानी शोध घेऊन अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले तर आरोपी सौरभ मस्के याच्यावर कलम 363 भादवी तसेच पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जमीन फेटाळून न्यायालईन कोठडीत रवानगी केली. यामुळे तो कारागृहात गेला व तिकडून सुटका झाल्यावर सौरभ ने टीचभर पोट जगविण्यासाठी गावातच एक किरायाने पान टपरी घेऊन आपला व कुटुंबाचा उदर निर्वाह करीत होता. पण समाजातील लोकांचा त्याच्याकडे बगण्याचा दृष्टिकोन काही वेगळाच असल्याने त्याच्या मनामध्ये चिंतेने घर केले व आपली यामुळे समाजात खूप बदनामी झाली आहे. यामुळे त्याने कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष्य करीत काल सकाळी नेहमी प्रमाणे आपली पान टपरी उघडली व दीवसभर व्यवसाय केला परंतु त्याच्या मनात चिंता सतावत असल्याने त्याने त्याच ठिकाणी रात्रीच्या सुमारास टॉवेल ने गळफास लावून जगाचा निरोप घेतला या प्रकरणी देवळी पोलिसानी कलम 174 जा.फो. नुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सौरभच्या जाण्याने त्याच्या परिवारावर चांगलाच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आजची युवा पिढी कोणताही आपल्या भविष्याचा विचार न करता मूल-मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात परंतु प्रेम करतांना निसर्गाने काही बंधने घालून दिली आहे. ती बंधने तोडून कामवासनेच्या आहारी जावुन आपली आणि कुटुंबाचीही मान खाली जाईल असे कृत्य करतात. अश्याच एका घटनेने अखेर सौरभला हे जग सोडून जावे लागले आणि स्वतःच्या कुटुंबाला जीवनभराचे दुःख देवून गेला.
