धक्कादायक:रुग्णालयात शिरला बिबट्या ,अखेर सहा तासाच्या थरारानंतर जेरबंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सावंगी (मेघे) येथील शालिनीताई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीवर रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्याला सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास बिबट आढळून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सहा तासाच्या थरारानंतर बिबट्याचे सुरक्षित ‘रेस्क्यू’ करण्यात वन विभाग, पीपल फॉर ॲनिमल आणि पोलिसांना यश आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्दे
सावंगी रुग्णालय परिसरात खळबळ : नागरिकांसह रुग्णालय प्रशासनाने सोडला सुटकेचा नि:श्वास
वर्धा : सावंगी (मेघे) येथील शालिनीताई सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीवर रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्याला सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास बिबट आढळून आला. बिबट दिसताच रुग्णालय प्रशासनासह परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर सहा तासाच्या थरारानंतर बिबट्याचे सुरक्षित ‘रेस्क्यू’ करण्यात वन विभाग, पीपल फॉर ॲनिमल आणि पोलिसांना यश आले. बिबट्याला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांसह रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या ॲनॅसिशिया इमारीच्या वरील मजल्यावर बिबट बसून असलेला रुग्णालयातील कर्मचाऱ्याला दिसून आला. त्याने याची माहिती रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत तात्काळ वन विभागाला व पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ रुग्णालय परिसर गाठून पाहणी केली असता, बिबट रुग्णालयाच्या फाटकाच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडावर बसून असलेला दिसून आला. वन विभागाची चमूही घटनास्थळी दाखल झाली. पाहता पाहता बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली.

बिबट्याने झाडावरून उडी घेत थेट फाटकाबाहेर असलेल्या लगतच्या नालीत शिरला आणि मग सुरू झाला त्याला पकडण्यासाठी थरारक प्रवास. अखेर ८.२५ वाजता सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन ३.५६ मिनिटांनी संपले असून, बेशुद्ध करण्याच्या औषधाचा मारा करून त्याला सुरक्षितरीत्या नालीबाहेर काढून रेस्क्यू करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, संजय इंगळे तिगावकर तसेच उपवनसंरक्षक शेपट, तहसीलदार रमेश काळपे तर सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब थोरात, वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर, पीपल फॉर ॲनिमलचे आशिष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे आदी उपस्थिती होती.