
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत काल दिनांक २१ रोजी स्थानिक पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई आढावा सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी महाआवास अभियान,घरकुल अतिक्रमण नियमकुल करणे,अशा अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला.
आमदार कुणावार यांनी वनजमीनीवरील अतिक्रमनासंबंधी प्रलंबित आदिवासी बांधवांना तात्काळ पट्टे वितरित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या असून अपात्र अतिक्रमणधारकांचा पात्र यादीत समावेश करण्याविषयी सकारात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांमधे येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईसंबंधी उपाययोजना करण्याविषयी प्रशासनाने कारवाई करण्याचे आवाहन याप्रसंगी आमदार कुणावार यांनी केले.
सदर आढावासभेचे आयोजन विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे गटनेते नितीनभाऊ मडावी , पंचायत समितीच्या सभापती सौ शारदा आंबटकर,उपसभापती अमोल गायकवाड,जिल्हा परिषद सदस्य शरद सहारे,तहसीलदार सतीश मासाळ पंचायत समिती सदस्य वैशाली पुरके,श्रीमती ठक इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सभेचे संचालन विषय तज्ञ नितीन सुकळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिनेश चौधरी यांनी केले,सदर सभेच्या वेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामसेवक,सचिव,संबंधित अधिकारी हजर होते.
