
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, हिंगणघाट
हिंगणघाट प्रतिनिधी,दि.४
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिति अंतर्गत कार्यरत असणारे हमाल तसेच कामगार यांना संघटित करुन भारतीय कामगार सेनेची शाखा निर्माण। करण्यात आली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच भारतीय
कामगार सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष माजीमंत्री खासदार अरविंद सावंत यांचे आदेशाने भारतीय कामगार सेनेची संघटनात्मक बांधणी करण्याचा आदेश दिला आहे.
उपरोक्त आदेशानुसार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल तसेच कामगार यांचे संघटन तयार करून भारतीय कामगार सेनेची शाखानिर्मिती करण्यात आली,तसेच
कार्यकारणीसुद्धा गठीत करण्यात आली.
केन्द्र सरकारने निर्माण
केलेले नविन कामगार कायदे कामगांराच्या हिताचे नाही म्हणून त्याची भिती कामगारांमध्ये निर्माण झाली आहे.
कामगारांचे मनात
शिवसेनेबाबत आदर व विश्वास आहे. आमच्या न्याय व हक्का करीता शिवसेनाच आधार देऊ शकते,ही बाब कामगारांना आता पटली आहे.
आज दिनांक ०४ रोजी कामगारांनी एकत्रीत येऊन सभा बोलावून आयोजित केलेल्या सभेत भारतीय कामगार सेनेचे संघटन उभे केले. या सभेला
प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिवसैनिक सिताराम भूते हंयानी संबोधित केले, कामगारांनी स्थापन केलेले शिवसेनेचे संघटन जोमाने वाढविण्याचे आवाहन श्री भुते यांनी उपस्थित कामगारांना केले.
यावेळी सभेला सुनिल आष्टिकर, संजय आत्राम तसेच एस.टी. कामगार सेनेचे पदाधिकारी प्रमोद काटकर,सतिश चतूर, धनराज तूपट इत्यादि प्रमुख अतिथिसह असंख्य शिवसैनिक
व कामगार उपस्थित होते.
