आजाद समाज पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष पदी #अश्विन तावाडे यांची नियुक्ती!

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, वर्धा

दी.26 जून 2021 रोजी भिम आर्मी संस्थापक तथा, आझाद समाज पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.चंद्रशेखर आजाद महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता #पुणे एथे उपस्थित कार्यकता बैठक आयोजित करण्यात आली तेव्हा आजाद समाज पार्टी च्या संपूर्ण महाराष्ट्रात जबाबदाऱ्या देण्यात आल्या सोबतच वर्धा जिल्ह्यातील अश्विन तावाडे हे मागील 4 वर्षा पासून भिम आर्मी जिल्हा उपाद्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून ते 2019 चे हिंगणघाट,समुद्रपूर सिंदी-रेल्वे या विधानसभा क्षेत्रातून उमरेवारी सुद्धा केली या कार्याची दखल घेता पार्टी वाढ विस्तार करण्यासाठी व महात्मा फुले,छत्रपती शाहू महाराज,डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी आजाद समाज पार्टी वर्धा जिल्हा अध्यक्षपदी मा.अश्विन तावाडे यांची नियुक्ती आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.चंद्रशेखर आझाद तथा मा.राहुल प्रधान महा.प्रदेशाध्यक्ष आजाद समाज पार्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांना नियुक्तीपत्र देऊन वर्धा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली.