अन पोलीस अधीक्षक साहेबांचा फोन खनखनला विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या कडून आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यावर झालेल्या हल्याची भेटघेत विचारपूस तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – कार्यकर्त्यां सोबत असा ठाम विश्वास देत धीर

आर्वी/प्रतिनिधी/पियुष रेवतकर

आर्वी:-दिनांक, 29/07/2022 रोजी वर्धा पूर ग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावर असताना आर्वी येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांना 10/07/2022 ला झालेल्या हल्ला बाबत पीडिताची भेट घेण्यासाठी जिल्हाध्य्क्ष सुनील राऊत यांच्या पुढाकारात स्थानिक विश्राम गृहात राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बोलावून भेट घेतली, या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात शिष्ट मंडळ व पीडित महिला तक्रारदार प्रज्ञा उर्फ डोरली हुमणे यांनी झालेली घटना कथन केली 10/07/2022 रोजी रात्री दोन वाजता प्रज्ञा हुमणे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांच्या घरावर सराईत गुन्हेगार ज्याच्यावर यापूर्वी तडीपार कारवाई झाली असुन त्यापूर्वी व नन्तर सुद्धा गंभीर गुन्ह्यांची मालिका नावावर असलेले रवी गाडगे व 10-12 सशस्त्र हल्ले खोरानी हल्ला केला होता याची तोंडी तक्रार आर्वी पोलीस स्टेशनं ला सकाळी देण्यात आली होती परंतु स्थानिक पोलीस विभागानी तक्रार सांगितल्या प्रमाणे न लिहिता गभीर गुन्ह्यात अदखल पात्र नोंद घेत आरोपी व टोळी ला संरक्षण दिल, त्यांनतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील साळुंखे यांना भेटून लिखित तक्रार दिली परंतु आर्वी पोलीस विभाग सराईत गुन्हेगार अवैध धंदे सर्रास चालवणारे व अनेक गम्भीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या रवि गाडगे व टोळी वर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ झाली या बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कार्यालयात भेट देत सर्व हकीकत ऍडिशनल एस पी यशवंत सोळंके साहेब यांना सांगितली असता त्यांनी पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांना कारवाई च्या सूचना केल्या परंतु आर्वी चे ठाणेदार व आर्वी पोलीसांनी त्यांच्या सूचना चा सुद्धा अवमान करत गुन्हेगाराला बळ देण्याच काम केल्या गेलं ही सर्व हकीकत सांगितली असता विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर साहेब यांना संताप व्यक्त करत अश्या गुन्हेगारा विषयी अशी मवाळ भूमिका म्हणजे गुन्हेगारीला खतपाणी घालने असुन यावर तातडीने कारवाई करून या बाबतीत मला कळवा अश्या सूचना केल्या यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील जी राऊत, संपर्क प्रमुख सुबोध मोहिते पाटील, अभिजीत फाळके पाटील यांनी सुद्धा गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी हा प्रश्न अधिवेशन काळात पटलांवर घेणे गरजेचे असल्याची विनंती विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांना केली तस पत्र जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे व स्थानिक पदाधिकारी यांनी सर्व कागदपत्र पुरावे गुन्ह्यांची यादी जोडून दिले.