
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
व्हराडी कवी प्रदिप कडू यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात दि २७ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता प्रसिद्ध कवी मा श्री नितिन देशमुख यांच्या हस्ते होत असून या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक मा प्रा मोहन शिरसाट, व मा डॉ मंजुषा सावरकर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा श्री पं शंकरप्रसाद अग्निहोत्री अध्यक्ष जय महाकाली शिक्षण संस्था वर्धा असणार आहे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री डॉ प्रो सतीश पावडे हे असणार आहे,राजभाषा मराठी महोत्सव आयोजन समिती, जय महाकाली शिक्षण संस्था,आणि लॉयन्स क्लब गांधी सिटी वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे ,कार्यक्रमाचे स्थळ अग्निहोत्री कॉलेज रामनगर वर्धा येथे संपन्न होत आहे, अशी माहिती राजभाषा मराठी आयोजन समितीचे प्रमुख श्री संदीप चिचाटे व डॉ रत्ना नगरे यांनी सांगितले आहे.
