तुर आयातीच्या केंद्र सरकारच्या विरोधात प्रहारचे ताली थाळी बजाव आंदोलन

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे

सध्या भारतात ४२ लाख टन तुरीची आवशकता असुन ४५ लाख टन तुर आपल्या भारतात उपलब्ध असताना सुध्दा केंद्र सरकारने ६ लाख टन तुर विदेशातून आयात करून देशातील शेतकऱ्यावर अन्याय करून त्याना देशोधडीला लावण्याच काम केंद्र सरकार करत आहे तसेच तुर, मुंग, उडीद, आयात पुर्ण पणे खुली करून, धाण्याचे भाव पाडण्याचा मनसुबा केंद्र सरकरचा आहे त्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक शेतकरी नेते मा .ना बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य याच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे वर्धा जिल्हाप्रमुख जयंतभाऊ तिजारे याच्या प्रमुख उपस्थितीत समुद्रपुर तहसिल कार्यालय समोर टाळ्या व काळ्या वाजवुन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन शेतकऱ्याच्या समर्थनात आंदोलन करण्यात यावेळी समुद्रपुर तालुका प्रमुख व ग्रा पं सदस्य प्रमोद म्हैसकर, युवा आघाडी तालुका प्रमुख व उपसरपंच अजय खेडेकर, अमोल झाडे, समुद्रपुर शहर प्रमुख संदिप चांभारे, रोशन थुटे, कांढळी संर्कल प्रमुख, शैलेश झाडे अतुल गुजरकर, समुद्रपुर शाखा प्रमुख आकाश झाडे, उपशाखा प्रमुख सौरभ आत्राम, राहुल वानखेडे हे प्रामुख्याने उपस्थित होते …