लोकहित महाराष्ट्र च्या बातमीची दखल, वडनेर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धडक कार्यवाही,राळेगाव पोलीस मात्र झोपेत?

राळेगाव पोलीस गेले कोमात वडनेर पोलीस जोमात

राळेगाव तालुका प्रतिनिधी
रामभाऊ भोयर
9529256225

   

राळेगाव तालुक्यातील राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत असल्याचे वृत्त लोकहित महाराष्ट्र या वृत्तांने ३ मे रोजी प्रकाशित केले होते या वृत्तपत्राची दखल खऱ्या अर्थाने राळेगाव पोलीस यांनी घ्यायला हवी होती परंतु ही दखल राळेगाव पोलिसांनी न घेता वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांनी घेऊन सदर संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातून अवैध दारू आयात करून काही दारू विक्रीते अवैधरित्या दारू करतात अशी माहिती प्राप्त झाल्याने ठाणेदार राजेंद्र शेटे यांनी त्यांच्या स्टाफ कडून सदर ४ मे रोजी सायंकाळी विषय मोहीम राबवून दोन दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असुन त्यांना घरपोच दारू पुरवठा करणारे दोन फरार झाले आहे.सदर वडनेर पोलिसा कडून करण्यात आलेल्या कार्यवाही मध्ये आरोपी क्र.(१) राऊल विक्रम मेश्राम वय ३६ वर्ष रा.आजनसरा ता.हिंगणघाट जिल्हा वर्धा यांचे कडून ४५०० रुपयांची देशी दारूचा मला जप्त असुन त्यास दारू पुरवठा करणारा राऊल इश्वर वनकर रा.टाकळी नीधा हा फरार असुन तसेच आरोपी क्र.(२) देवानंद नथ्थुजी सोनटक्के वय ३३ वर्ष रा.दापोरी (कासार) ता.राळेगाव जिल्हा यवतमाळ यांच्या कडून ४९०० रुपयांचा देशी दारुच्या माल जप्त केला असुन वरिल आरोपींना दारू पुरवठा करणारा वडकी येथील कुख्यात दारू तस्कर उमेश मारोती कुणघाडकर रा.वडकी हा फरार असुन सदरची कार्यवाही वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज धात्रक तसेच नायक पोलीस अंमालदार अजयकुमार वानखेडे,प्रशांत वैद्द ,तुषार इंगळे,यांनी केली आहे. सदर राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन वर्धा जिल्हात दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असुन मात्र राळेगाव पोलीस गप्प का ? असा प्रश्न या परिसरात उपस्थित होतांना दिसत आहे.तर वडकी येथील दारू विक्रीता राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन वर्धा जिल्ह्यात व राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात घरपोच दारू पुरविण्याचे काम खुले आम करत असतांना सुध्दा यावर कुणाचीच नजर पडत नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे.