
:-
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर
कारंजा (घा):-पाणीटंचाई शहराला नवीन नाही.दरवर्षी नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.अनेक निवेदने, आंदोलनेही पाण्यासाठी करण्यात आले.अखेर चार वर्षाच्या अथक प्रयत्नाने शहरातील पाणीपुरवठा योजनेला 20 कोटी 2 लाखांची तांत्रिक मंजुरी मिळविण्यात यश आले असून पाणीपुरवठ्याची फाईल शासन दरबारी पोहचली आहे.शहरातील पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा असल्यामुळे पाणी प्रश्न सोडविणे आवश्यक होते.2017-18 मध्ये कारंजा शहरातील पाणीपुरवठ्याचा डीपीआर तयार करण्याकरिता एडिसी नागपूर या कंपनीला दिला होता.दोन वर्षात शहरात आवश्यक पाणीपुरवठा डीपीआर तयार करून दिला .परुंतु मागील दोन वर्षात कोरोना महामारी मुळे व एक वर्ष प्रशासक असल्यामुळे त्याचा पाठपुरावा होऊ शकला नाही.पाणीपुरवठा योजनेच्या सतत पाठपुराव्या नंतर अंतिम टप्प्यात असलेल्या 20 कोटी 2 लाखांची पाणीपुरवठा विभागाला तांत्रिक मंजुरी मिळाली.तांत्रिक मंजुरी हा पहिला टप्पा पार झाला.पाणीपुरवठ्याची फाईल शासन दरबारी मुंबई येथे गेली असून लवकरच या पाणीपुरवठा योजनेला निधी उपलब्ध केला जाईल ,असा विश्वास आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे यांनी व्यक्त केला.शासन दरबारी शहरातील पाणीपुरवठाचा प्रश्न ठेऊन व स्वतः फाईल अंतिम टप्प्यात ठेवत निधी उपलब्ध केला जाईल ,असेही अमर काळे यांनी सांगितले.
