
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
वर्धा येथील दैनिक सहासीक संपादक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करून हल्लेखोरांना त्वरित अटक करण्याची मागणी मुख्यमंत्री यांना जिल्हा निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केली आहे वर्धा येथील दैनिक सहासीक संपादक रविंद्रज कोटबकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला एका निर्भीड पत्रकारावर हल्ला म्हणजे चौथ्या स्तंभावर हल्ला करण्यात आला ही बाब अत्यंत निंदनीय असून हल्लेखोरांना पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले याप्रकरणी दिनांक 20 एप्रिल दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओमकार चेके पवनपुत्र संतोष धुमाळे दत्तू कुशवाह सचिन चौधरी निलेश पवार राज्य भागन करकर इत्यादी यावेळेस उपस्थित होते.
