देवळी भारत सामाजिक ग्रूप गेल्या १० वर्षापासून जनतेच्या सेवेसाठी रक्तदानास तत्पर,वेगवेगळ्या कार्यामधून जनतेची सेवा करण्याचा ध्यास

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

देशसेवेची भावना आपल्या सर्वामध्ये थोड्या का प्रमाणात असेना सर्वामध्येच असते. देशासाठी आपणही काहीतरी करावे असा ध्यास सर्वामध्ये असतो याच देशसेवेच्या भावनेतून काही लोक आपल्या प्राणाची आहुती देतात तर काही लोक आपल्या कार्यातून देशसेवेत सहभागी होतात. हे देशप्रेम सीमेवरील लढणाऱ्या जवानांचे असो किंवा रात्रंदिवस झटणाऱ्या डॅाक्टर, पोलिस व इतर सरकारी कर्मचारी या प्रत्येकांमध्ये देशसेवेची भावना आहे आणि हेच देशप्रेम जणू ते आपल्या वेगवेगळ्या कार्यामधून व्यक्त करीत असतात.
वर्धा जिल्यातील देवळी शहरातही काही समाजसेवकांनी आपली‌ देशसेवा रक्तदान मार्फत व्यक्त केली आहे. देवळी येथील सामाजिक ग्रूप गेल्या १० वर्षापासून देशप्रेमाची भावना मनात ठेवून समाजसेवा करीत आहे.
भारत सामाजिक ग्रूप गरजू व गरीब लोकांना मदत करण्याकरीता नेहमी तत्पर आहे. केवळ शहरातच नाही तर संपुर्ण महाराष्ट्र तसेच कोणत्याही राज्यात गरजू व गरीब लोकांपर्यत रक्तदान साठी नेहमी झटत असतो. भारत सामाजिक ग्रुपमुळे शारदा बहेन हॉस्पिटल, अहमदाबाद (गुजरात) ला जाऊन रक्तदाते युवा पत्रकार तथा समाजसेवक रविंद्र पारीसे , सचिन वैद्य यांनी रुग्ण किशोर तांदळे यांना रक्तदान करुन प्राण वाचविण्यात यश आणले. व सचिन वैद्य यांच्या फोनवर अनोळखी एक कॉल आला ते म्हणाले की दादा रुग्णालय सावंगी (मेघे) येथे अर्जेंट ऑपरेशन करण्यासाठी चार बॉटल रक्ताची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.आणि तुमचे नाव रवी नाखले यांनी सांगत मला तुमचा मो.नंबर दिला असे त्यांनी सांगितले असता त्यांना मी धीर देत म्हटले की घाबरु नका आपल्याला रक्त नक्की मिळेल त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करीत काही लोकांकडून सहकार्य मिळेल अशी खात्री दिली. त्यात काल सामाजिक बांधिलकी जपत अक्षरशः डोळ्याने पाहत वेळात वेळ काढून देव अवतरले लगेच रक्तदान करून रुग्णाला अधिक जीवन जगण्यासाठी धडपड केली.त्यांची नावे /रक्तदाते निकलेश महेशकर , मोहनदास कुमरे , विरेंद्रा धूर्वे , बळवंत कूमरे इत्यादींनी रुग्ण सरफसिंग कुमरे यांना रक्तदान करून गरीब होतकरु व्यक्तीचे प्राण वाचविण्यात यश आले. तसेच इतर लोकांनी सुध्दा यामध्ये योगदान आणि सहकार्य दिलेले आहेत.