
अल्लीपूर. जिल्हा वर्धा. (अल्लीपूर येथील बत्ती गुल व ग्रामपंचायत मध्ये मात्र पैसा फुल. ) अल्लीपूर येथील गावातील रोड लाईट गेल्या 3दिवसापासून बंद आहे. या अल्लीपूर गावामध्ये पहिल्यांदाच गेल्या 25वर्षात अंधार पाहायला मिळाला. MSEB ची बिल न भरल्यामुळे ग्रामपंचायत अल्लीपूर अंधारात दिवस काढत आहे. ग्रामपंचायत ला वार्षिक इन्कम अंदाजे 12 लाख ते 13 लाख आहे तरी सुद्धा ग्रामपंचायत कडे रोड ची लाईट बिल भरायला पैसे नाही. आज अल्लीपूर करिता सरमेची वेळ आली आहे.निव्वळ डीसाळ कारभारा मुळे.अल्लीपूर मध्ये माननीय. सुरेशभाऊ वाघमारे (माझी खासदार)( भाजप )यांचे जन्म गाव अल्लीपूर आहे.मोठे नेते याच गावातले आहे.तरी सुद्धा एक नेता काहीही बोलायला तयार नाही हे या गावाचे दुर्भाग्य.आम्ही MSEB अभियंता नरड यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले कि वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्या आदेशाने लाईट बंद करण्यात आली. MSEB ची लाईट ची थकबाकी ग्रामपंचायत कडे 35 लाखाच्या आसपास आहे. ग्रामपंचायत ला या अगोदर 2 महिन्याची मुदत देण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायत ने कुठलेही देयके दिलेली त्या मुळे कारवाई करण्यात आली असे सांगण्यात आले.आपला प्रतिनिधी. राजेश्वर ढेकण अल्लीपूर.
