अखेर पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मिळाली तांत्रिक मंजुरी,संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या प्रयत्नाला मिळाले यश.

:

कारंजा घाडगे/प्रतिनिधी

कारंजा (घा) :-संभाजी ब्रिगेड नागरीकांच्या सकारात्मक सहकार्याने आजपर्यंत कारंजा शहरातील अनेक नागरी समस्येकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून सनदशीर मार्गाने संघर्ष करीत आलेली आहे.त्यापैकी शहरातील गंभीर अशा पाणी समस्येच्या संदर्भात शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व प्रस्तावित प्रलंबित वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी यासंदर्भात आज पर्यंत समंधीत विभागाला अनेक निवेदने दिले ,पाणी समस्ये बाबत शहरातील नागरिकांचे मते जाणून घेण्यासाठी ऑनलाइन सर्वे केला .संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात नागरिकांचा हा संघर्ष अनेक वर्षा पासून चालू होता. अखेर पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळाली ,प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून नागरिकांच्या आशा पल्लवीत आहे.पियुष रेवतकर यांच्या अनेक वर्षा पासून चालू असलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्याने कारंजा शहरातील नागरिकांतर्फे त्यांचे कौतुक केले जात आहे.