
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ६/१२/२०२१ रोजी डॉं. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात सर्व प्रथम विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींनी सुद्धा प्रतिमेचे पुजन केले.या कार्यक्रमाला विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेभेंकर सर,श्रावनसिंग वडते सर,दिगांबर बातुलवार सर रंजय चौधरी सर,राजेश भोयर सर, मोहन बोरकर सर,विशाल मस्के सर,सौ कुंदा काळे मँडम,सौ वंदना वाढोनकर मँडम, सौ स्वाती नेताम मँडम,कु वैशाली सातारकर मँडम,व शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे उपस्थित होते.
