राळेगाव येथील 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान,ऑटो चालक मालक संघटनेचा पुढाकार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

समाजऋण फेडावे या उदात्त हेतूने राळेगाव शहरातील ऑटो चालक मालक संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात संघटनेच्या माध्यमातून पन्नास रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे हे होते तर रा लेगाव तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे विनय मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर धनंजय पाटील नगरसेवक मंगेश राऊत पत्रकार संघाचे अशोक पिंपरे संजय दुरबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती तहसीलदार रवींद्र कानडजे यांनी ऑटो चालक मालक संघटनेच्या या उदात्त रक्तदान शिबिराचे कौतुक केले ऑटो चालक मालक संघटनेच्या माध्यमातून हा अनोखा कार्यक्रम राबविणे खरच स्तुत्य उपक्रम आहे चालक वाहकांनी नशापान करून वाहन चालवू नये कारण कारण नशापान केल्याने अपघाताचे प्रमाण वाढते त्यामुळे नशापान करून गाडी चालवणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा घ्यावी असे आव्हान याप्रसंगी तहसीलदार साहेब यांनी केले यावेळी शासकीय ब्लड बँकेचे डॉ सोनाली जुकाकल वार व त्यांचा संघ उपस्थित होता ऑटो चालक मालक संघटनेचे अध्यक्ष राजू देवकर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी ऑटो चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम शेंडे सचिव विलास धुमाळ सचिन गेडाम अबोल देवकर विकास येंच लवार गजानन भुडे निलेश मडावी प्रशांत भगत गजानन डंभारे यांनी पुढाकार घेतला चालक वाहक संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपले रक्तदान केले हे विशेष