
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
.
ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय कोर्टाने राखून ठेवल्या नंतर निवडणूक होणार की नाही या धाकधूकीत राळेगाव नगरपंचायतीच्या नगरपंचायत निवडणुकीत वैध ठरलेल्या 90 अर्जांपैकी आठ जणांनी आज दिनांक 13 12 2021 ला आठ जणांनी माघार घेतली . राळेगाव नगरपंचायत च्या एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नव्वद जणांनी 14 प्रभागासाठी आपले अर्ज दाखल केले होते ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्यावर आपला निर्णय राखून ठेवल्या नंतर निवडणूक होणार की नाही हे चित्र स्पष्ट होत नव्हते तरीही तिच्या तीन जागा सोडून उर्वरित 14 ही प्रभागातून 90 अर्ज वैध ठरले होते त्यापैकी आज ही निवडणूक कोण कोण लढणार ते स्पष्ट झाले
