
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव तालुक्यातील विहीरगांव येथे जहाल क्रीडा मंडळाने आयोजित कबड्डी सामन्यांचे बक्षीस वितरण सुधीर भाऊ जवादे सरपंच कीन्ही जवादे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.गांधीनगर व मांडवा या संघात झालेल्या अंतिम सामन्यात गांधीनगर संघ विजयी होऊन प्रथम पारितोषिक पटकावले.यावेळी वैकुंठराव मांडेकर,पांडुजी भेदुरकार , संजय कुंडलवार,,भुजाडेसर,दुर्गे सर उपस्थित होते.वैयक्तीक बक्षिसे जहाल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे हस्ते देण्यात आले.
