राळेगाव तालुक्यात अतिवृष्टी मुळे हाहाकर जन जीवन विस्कळीत तालुक्यात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके सर यांनी रावेरी चिकना, व तालुक्यात इतरही गावांमध्ये दौरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव दिनांक 18 जुलै च्या सततधार पावसाने राळेगाव तालुक्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेले आहे, पावसाने शेतीचे, जनावर,खत व घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, सतत वीस तास मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना महापूर आला, त्यामध्ये रावेरी, झाडगाव, सरई, निधा चिकना,पिंपरी दुर्ग, पिंपलखुटी, चाहांद,वरूड,नागठाणा, गुजरी,पिंपळगाव वाढोणा बाजार भांब,वडकी लाडकी कोच्ची, करंजी , सो रोहनी ,येवती, धानोरा नाही तर तालुक्यातील सर्व गावे या पाण्याने अनेक गावात पाणी शिरून गावातील संपर्क तुटला आहे, त्यासोबतच खूप मोठ्या प्रमाणात रावेरी येथील नवीन बसलेले 38 घराचे सर्व खाण्यापीण्याच्य सामना पासून सर्व साहित्य निशी वाहून गेले त्यांना कोणताही पर्याय नसल्याले गावातील लोकांनी पुरात अडकलेल्या लोकांना शरतीचे प्रयत्न करून त्यांना बाहेर कडण्यात आले तर सर्व जनावरांना मोकळे सोडून बाहेर कडण्यत आले, परंतु वेळ झल्याले काही जनावरांना आपले प्राण गमवावे लागले,अतिवृष्टी ग्रस्तांना शाळेत राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली, तसेच हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले, सोबतच राळेगाव शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे , त्यांचा सर्वांचा या पावसामुळे संसार उध्वस्त होऊन आज रोजी त्यांना संध्याकाळचं जेवण कसे करावे याची सुद्धा व्यवस्था नसल्याने काही ठिकाणी स्वतः गावातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी जबाबदारी घेऊन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसेच प्रत्येक गावात आपापल्या परीने त्यांचे जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली, परंतु हालाखीच्या परस्तीतीत प्रशासन काही ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आले असून तलाठी यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केल्या जात आहे, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुद्धा तालुक्यातील काही ठिकाणी लक्षपूर्वक आपला दौरा करून सर्व ठिकाणची पाहणी केली तसेच राळेगाव येथील तहसीलदार साहेब यांनी सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे , धुवाधार पावसाने कंबरडे सर्वांचे मोडले आहे,राळेगाव तालुक्यात दमदार पावसाने नदी नाले शेत तुडुंब भरून वाहत आहे,राळेगाव तालुक्यात अनेक गावात पाणी शिरले महसूल व कृषी विभागाणे पंचनामे करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी शेतकऱ्यांची व जनतेची मागणी आहे,राळेगाव तालुक्यातील अनेक गावांत पाणी शिरुन घरातील अनाज, घरातील वस्तू चे प्रचंड नुकसान झाले आहे,गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संताधार पावसाने राळेगाव तालुक्यातील अनाज, वस्तू,खते प्रचंड नुकसान झालेआहे.नुकसानग्रस्त शेताचे महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे राळेगाव तालुक्यातील परिसरात सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर पावसाचा जोर असल्यामुळे अगोदरच म्हणजे 09/07/2022 ला झालेल्या पावसाने शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जिरले होते गेल्या 24 तासापासून आलेल्या पावसाने तर धुमाकूळ घातला असून नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे आणि नदी नाल्यांची पाणी शेतात जाऊन पिकाचे व घरातील वस्तूचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नदी नाल्यांच्या पाण्याने पीक अक्षरता खरडून गेली असल्याचे चित्र उभे आहे या आसमानी संकटात संध्या शेतकरी सापडला आहे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीचा हात पुढे करेल काय, पंचनामा केव्हा होणार, आणि मदत कधीपर्यंत पोहोचणार असा अर्थ टाळू शेतकऱ्यांनी काढला आहे महागड्या बी बियाण्याची लागवड करून कसाबसा शेतकऱ्यांनी आपली शेत पेरले होते परंतु या आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता भरडला गेला आहे पुन्हा कर्जाचा डोंगर वाढणार आहे, आणि शेतकरी पुन्हा देशोधडीला लागणार आहे शासन मदत कुठपर्यंत करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.