
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
भवानी माता मंदीर ,जुना आठवडी बाजार येथे,
भारतीय नारी रक्षा संघटना,शाखा राळेगाव यांच्या संयोजनाने ,नवक्रांती लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या सहकार्याने कोव्हीड १९ जनजागृति हे एक छोटे खानी उपक्रम घेण्यात आला,,
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे,राळेगाव चे ठाणेदार संजयजी चौबे ,गुप्तचर विभाग युवराजजी पाईकराव , ज्येष्ठ पत्रकार डॉ.कैलाशजी वर्मा ,पत्रकार योगेशजी (गुड्डू )मेहता ,राजजी (पारसजी)वर्मा ,सुरेशजी सेलव्होटे , मैढ़ क्षत्रीय स्वर्णकार समाज अखिल भारतीय महीला संस्था,राळेगाव अध्यक्षा
सौ.सरोजताई वर्मा,जेष्ठ मार्गदर्शिका श्रीमती गांधी ताई,जिल्हा यवतमाळ क्षत्राणी महीला मंडलच्या उपाध्यक्षा सौ.प्रमीलाताई वर्मा,सौ.मनिषाताई सेलव्होटे,,सौ.हेमलताताई वर्मा,भारतीय नारी रक्षा संघटनेच्या अध्यक्षा सौ.संतोषीताई रा.वर्मा
यांच्या मार्गदर्शनात नवक्रांती लोक संचालित साधन केंद्र च्या व्यवस्थापिका सौ.रंजनाताई देशकर ,संयोजिनी सौ.वृशाली डाकोरे आलेल्या प्रमुख पाहुण्यानी येणाऱ्या कोव्हीड 19 ची तिसरी लाट जी येणार आहे डेल्टा प्लसची त्या वर मार्गदर्शन केले ,
आता सण वारांचे दिवस सुरु आहे,सध्या नवरात्री सुरु आहे,पुढे दशहरा व दिपावली येणार आहे,शाला,कॉलेज व ईतर व्यवहार आता सुरु झाले आहे ,पन त्याच बरोबर डेल्टा प्लस ह्या माहमारीचा ही प्रकोप भविष्यात जानवेल,त्या करिता जन सामान्य आणि विद्यार्थि आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या,प्रत्येक व्यक्ति ने आप आपली स्वत:ची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे,
कोरोना संपलेला नाही आहे,,ज्यांनी वैक्सीन नाही घेतली आहे त्यांनी वैक्सीन घेणे अनिवार्य झाले आहे,,तसेच श्री.डॉ.कैलाशजी वर्मा, श्री.गुड्डूजी मेहता नवक्रांती लोक संचालित द्वारा जे उपक्रम राबविल्या जात आहे त्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या की असे उपक्रम प्रत्येक गावो गावी ,गल्लोगल्ली घेण्यात यावे विशेष बचत गटाच्या महीलांनी सौ.संतोषीताई यांचे धन्यवाद दिले , तसेच महाप्रसादाचे ही वितरण करण्यात आले ते ही कोव्हीड 19 चे नियम पाळुन.नवक्रांती लोकसंचालीत साधन केंद्र राळेगाव येथील cmrc व्यवस्थापिका रंजना देशकर सहयोगीनी वृषाली डाखोरे व मोठ्या संख्येने बचत गटातील महीला उपस्थित होत्या.
संचलन व आभार प्रदर्शन सौ.रंजनाताई देशकर यांनी केले.
