ड यादीतील अपात्र घरकुलासाठी वनोजा येथील सरपंच व उपसरपंच यांचा उपोषणाला बसण्याचा इशारा

               

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर. मोबाईल नं- (9529256225)

राळेगाव तालुक्यातील वनोजा येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ मध्ये एकूण 129 लाभार्थी यादी होती परंतु त्यापैकी 62 लाभार्थी पात्र झाले व 67 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले त्यासाठी ग्रामपंचायत वनोजा येथील सरपंच- सौ.चंदाताई म.पोटरकर. उपसरपंच- श्री. प्रभाकर दांडेकर. ग्रा.पं. सदस्य- सौ. मालू दिनेश कोटनाके.श्री. संजय दौलत आत्राम.ग्रा.वि.सोसायटी चे संचालक- श्री. प्रफुलभाऊ तायवाडे. खरेदी विक्री संघ राळेगाव चे संचालक- श्री. अशोकराव काचोळे तसेच लाभार्थी यादीतून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा उपोषणाला बसण्याचा प्रशासनाला इशारा प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ वनोजा येथील यादी मध्ये एकूण 229 लाभार्थ्यांची यादी होती,त्या यादीमधून 67 लाभार्थी गावातील अति गरजू ,पडक्या,मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना अपात्र दाखविले त्या लोकांची खोटी माहिती दाखवून त्यांना घरकुला पासून वंचित ठेवण्यात आले, आणि गावातील अनेक गरजू लाभार्थ्यांना घराचे पट्टे नसल्यामुळे सुद्धा वंचित राहावे लागत आहे तरी त्या लाभार्त्यांची प्रशासनाने फेर तपासणी करून त्या लाभार्त्याना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यता ग्रामपंचायत वनोजा व 67 गाळलेल्या गरजू लाभार्थ्यांचा प्रशासनाला उपोषणाला बसण्याचा इशारा व तालुक्यात अनेक ठिकाणी अशाच प्रकार चालू आहे माननीय गटविकास अधीकारी साहेब व माननीय तहसीलदार साहेब यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे असे जनसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.