२५ वर्षीय युवकाचा अपघातातील उपचार दरम्यान मुत्यु

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

तालुक्यातील नरसाळा येथील युवक केळापूर देव दर्शन करून परतीचा प्रवास करत असतांना कोठोडा जवळील पुला जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला होता तर एक गंभीर जखमी झाला होता.दि. १४ ऑक्टाेंबरला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भीषण अपघातात शंकर बाळू माहुरे (२१) रा. नरसाळा हा जागीच ठार झाला होता. तर राहुल मेश्राम (२५) रा. सखी (कृष्णापुर ) ता. राळेगाव हा युवक गंभीर जखमी झाला होता.

त्याला तातडीने यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि तो तिथे जवळपास सात दिवस आय सी यू मध्ये उपचार घेत होता. परंतु राहुल ला नशिबाने सात दिली नाहीत व आज दि. २१ ऑक्टो. २०२१ ला सकाळी ठिक ७ वाजता दरम्यान, त्याची प्राणज्योत मावळली.