गायत्री फाउंडेशन ने वृद्धाश्रम ( हरसूल) येथे, वंदनिय बाळासाहेब ठाकरे जयंती आरोग्य शिबिराने केली साजरी.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

नागसेन वृद्धाश्रम हरसुल येथे, गायत्री फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मी स्वतः व सचिव सौ विद्या उत्तम राठोड . आम्ही प्रथम वंदनीय हिंदुहृदय सम्राट, अखंड हिंदुस्थानचे कैवारी, बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले! व वृद्धाश्रमातील स्त्री पुरुष यांच्या आरोग्याची तपासणी केली, व मोफत औषधोपचार केले! याप्रसंगी गायत्री फाऊंडेशनचे . पियुष राठोड, खुशाल राठोड, यश राठोड, निशाण गवळे, सै. रहेना, नकुल शेरे, अजय राठोड, जयपाल राठोड, कैलास राठोड, गोपाल चव्हाण, सुजित राठोड, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते! दिलेल्या सेवेच्या संधीबद्दल वृद्धाश्रमाच्या संस्थापक यांचे गायत्री फाउंडेशन तर्फे आभार मानण्यात आले ! जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र,