भाऊबीज निमित्ताने विधवा बहिणीला माहेरची साडी चोळी देऊन केला सन्मान – मधुसुदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथे विधवा महिलांसाठी भाऊबीज च्या निमित्ताने माहेरची साडी देवुन “महिला सन्मान” कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित मा.ॲड.वामनरावजी चटप साहेब माजी आमदार स्वतंत्र भारत पक्ष हे होते आणि मा.रंजनाताई मामर्डे महिलाअध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.कृष्णाजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ उपस्थित होते.

ग्राम स्वराज्य महामंच च्या वतीने राळेगाव येथिल दिवाळी सणाच्या पर्वावर दुर्दैवी अपघाती संकटात कु.संस्कृती धुमाळे आणि वर्णा येथिल राऊत कुटुंबातील आधार यांच्या अपघाती मृत्यू ने दिवाळी दिवा पेटलाच नाही अशा दुर्दैवी संकटात सहभागी होवून विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि ग्राम स्वराज्य महामंच यांनी मौन श्रद्धांजली वाहुन दुःख व्यक्त केले.

अंधारमय भाऊबीज निमित्ताने विधवा महिलांसाठी आधार म्हणून अंतरगाव येथिल माजी सरपंच सुनीताताई तोमर आणि रामतिर्थ येथिल रत्नमाला गेडाम यांना मा.वामनरावजी चटप साहेब यांच्या हस्ते माहेरची साडी चोळी देऊन आधार देण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसूफ भाई सय्यद राळेगाव अखिल भारतीय कीसान संघ यांनी केले कार्यक्रमात विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना चा सहभाग म्हणून विठ्ठलराव देशमुख कृष्णापुर ,अरविंदजी डंभारे आंजी, रमेशराव पेंदाम तेजनी,योगेशजी इंगोले, दत्ताजी मरस्कोले पिंपळखुटी, भगवंतराव धनरे, विठ्ठलराव मेश्राम, सत्यप्रकाशजी उमरे, अशोकराव कपिले, अरुणजी जोग, नितीनजी ठाकरे, राजेंद्रभाऊ झोटींग, गोपालराव भोयर, अक्षयजी महाजन, दिक्षाताई नगराळे यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.

सहभागी सर्व लोकांचे मनःपूर्वक आभार मा.मधुसुदनजी कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी मानले आहे.