
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
ढानकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील वृद्ध महिलेला रानडुकरांनी धडक देऊन चावा घेतल्याची घटना दिनांक 05/07/22 रोजी सकाळी घडली
सावळेश्वर येथील आबादीत राहणाऱ्या वृद्ध महिला सुमनबाई माधव कांळबांडे वय 72 वर्ष गावात शिधापत्रिका घेऊन स्वस्त धान्य दुकानात जात असताना अचानक रानडुकर धावत येऊन तिला खाली पाडले व हाताला चावा घेतला रक्त बोंबाळा अवस्थेत असलेल्या महिलेने वाचवा रे वाचवा ही हाक दिली तेव्हा नागरिक जमले तेंव्हा रानडुकरांनी पळ ठोकला. रक्त बंबाळ झालेल्या सुमनबाईला परमेश्वर रावते ग्रा.प.सदस्य यांनी दवाखान्यात दाखल केले व रानडुकरांनी हवा हल्ला केल्याची माहिती वन विभागातील वन अधिकारी आडे यांना मोबाईल वरून माहिती दिली. निराधार महिलेला आधार देण्यासाठी एकही वन विभागात कर्मचारी उपस्थित झाला नाही त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला निराधार असलेल्या सुमनबाईला आता वनविभाग आधार देईल का. वनविभागातील हिंसक प्राण्याच्या हैदोसानी आता मात्र ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे जंगलातील हिंसक प्राणी होता बंदोबस्त त्वरित वन विभाग अधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी मात्र आता जनतेतून होत आहे.
