राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती इंदिरा गांधी माध्यमिक ज्युनियर कॉलेज वडनेर येथे साजरी करण्यात आली

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

वडनेर, २ऑक्टोंबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती इंदिरा गांधी माध्यमिक ज्युनियर कॉलेज वडनेर येथे साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दिनेश राठोड सर यांनी केले.तरी वर्ग ५ ते १२ च्या मुला मुलींनी मा. गांधी यांच्या जीवन कार्या बद्दल माहिती दिली .चित्र प्रदर्शन केले . हटवार कर मॅडम .ढोले सर .प्रिन्सिपॉल भगत मॅडम यांनी सुद्धा महापुरुषाच्या जीवन कार्या बद्दल मार्गदर्शक केले .तसेच मा.गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त आंबेडकर कॉलेज चे विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ता वृक्षप्रेमी ,प्रतिक शालीक भगत यांनी वृक्ष रोपण करून झाडे लावा झाडे जगवा . वृक्षानपासून होणारे फायदे फळे ,फुले , ऑक्सिजन ,लाकडे ओषधी मिळतात .. एक तास ऑक्सिजन देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो .तर आयुष्य भर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना देव का मानत नाही ? प्रत्येकाने एक झाड लावले तर नक्कीच हिरवे गार पर्यावरण सोंदरियकरण होईल करण्यात जनजागृती आली .तरी शाळेतील प्रा .लोनावळे सर. ढाले सर .इंगळे सर .मडावी सर.तलवटकर सर.महाजन मॅडम .मोगरे मॅडम .उर्कुडकर मॅडम .तसेच सर्व कर्मचारी उपस्थित असून विद्यार्थी मित्र यांचे कोतुक करून मडावी सर यांनी कार्यक्रमाचे समारोप केले .