रावेरी येथे हनुमान जन्मोत्सव साजरा व महाप्रसादाचे आयोजन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून असलेले रावेरी हे गावअसून तेथे एकमेव सीता माता मंदिर आहे, तसेच जागृत हनुमान मंदिर सुद्धा आहे व वाल्मिकी ऋषींचा मठ पण आहे, दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री हनुमानजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो, गेल्या दोन वर्षाच्या अगोदर कोरीना काळ असल्याने जन्मोत्सव उत्सव साजरा करण्यात आला नाही परतु रावेरी येथे संपूर्ण राज्यातून जनता हनुमानजी व सीतामाई यांच्या दर्शनासाठी रावेरी येथे पोहोचतात त्यानिमित्ताने रावेरी येथे भागवत सप्ताह राम नवी पासून सुरू होत असून हनुमान जयंतीला समारोप केला जातो सकाळी जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर गावातून दिंडी यात्रा काढण्यात येते यात जय श्री राम, जय हनुमान जय घोशाणे संपूर्ण रविरिकर सहभागी होतात तर बाहेरून आलेले भाविक मंडळी उपसथित असतात त्यामध्ये गावातील सर्व वारकरी भजन मंडळ, महिलांचे भजन मंडळ, अवधूत भजन मंडळ, तुकडोजी भजन मंडळ असे सर्व भजन मंडळी हजर असतात तसेच गावात जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात येते त्यानंतर दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो महाप्रसादाचा कार्यक्रमात जवळपास पाच ते सहा हजार लोकं महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि हे सर्व कार्ये लोकवर्गणीतून केल्या जातत हा परंपरागत विषय रावेरी येथे सुरू आहे सर्व व्यवस्था गावातील तरुण व प्रौढव्यक्ती लोकवर्गणीतून करतात,नंतर संध्याकाळी शोभायात्रा श्री हनुमान जी यांचा प्रतिमेच्या पूजन करून शोभायात्रा काढण्यात येतात शोभायात्रेमध्ये गावातील सर्व लोक हजर राहून शोभा यात्रा पूर्ण रावेरी गावात प्रदर्शना करून हनुमान मंदिर रावेरी येथे हनुमानजी आरतीने समारोप करण्यात येतो.