
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
गेल्या तीन- चार वर्षांपासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ‘मोबाईल ॲप’द्वारे जमिनीतील पिकांचा पीक पेरा ऑनलाइन भरला जात आहे. ‘प्ले स्टोअर’वर जाऊन वर्जन टू ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतीच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ‘ॲप’च्या माध्यमातून पीक पाहणी केली जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्याकडे मोबाईल नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अँड्रॉइड मोबाईल शेतकऱ्या कडे नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. या मुळे शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल शासनाने मोफत देण्यात यावा अशी मागणी शेतकरी मित्र स्वप्निल वटाणे यांनी केली आहे.
अगोदरच पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यात जमिनीची ई- पीक पाहणी वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. जिल्ह्यासह तालुक्यात बहुतांश शेतकरी अतिवृष्टी, जास्त पाऊस परतीचा पाउस यामुळे शेताचे नुकसान होऊन आर्थिक अडचणीत आहे. यामुळे शेतकऱ्याला मोबाईल घेणे शक्य नाही. शेतीची ई- पीक पाहणी झाली नाही तर भविष्यात शासनाकडूनशेतीसाठी मिळणारे विविध अनुदान, पीक विमा, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत आदी विविध योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
प्
राळेगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल नसल्यामुळे ई पीक पाहणी करू शकले नाही. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर, रिचार्ज शासनाकडून मिळते. ते त्यांना ऑनलाईन कामासाठी आवश्यक आहे. मात्र शासनाने आता शेतकऱ्याला ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्याला मोफत अँड्रॉइड मोबाईल देण्याची अत्यंत गरज आहे. ज्यामुळे कोणताही शेतकरी ई पिक पाहणी पासून वंचित राहणार नाही. ई पीक नोदणी साठी कोणा कडे हात जोडाची गरज राहणार नाही. सर्व शेतकऱ्यांची एपिक पाहणी ऑनलाईन होऊन त्याला सर्व योजनांचा लाभ घेता येईल.
