ज़िल्हा माहिती कार्यलयाच्या वतीने शासकीय योजनांचे माहिती देणारे चित्ररथ तयार


उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तूळशीराम राठोड (ग्रामीण )


सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासकीय योजनाची जत्रा हा चित्ररथ तयार करण्यात आला. आज यवतमाळ येथे या चित्ररथला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवूनमार्गस्त केले .यावेळी माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे साहेब,निवासी उपजिल्हा अधीकारी ललितकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्ती पर्यत पोहोचवण्यासाठी शासकीय ्योजनाची जत्रा हा उपक्रम राज्यभर सूरू करण्यात आलाय.