
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे मित्राला फोन लावून त्याच्याशी बोल म्हणून पत्नीला आग्रह धरला. ती ऐकत नाही असे दिसल्यावर मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्राला घरी बोलून तो थांबलेल्या खोलीत पत्नीला फरफटत नेऊन सोडले दारुच्या नशेत पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची महिलेची तक्रार आल्यानंतर बिटरगाव पोलिसांनी पतीसह त्यांच्या मित्राविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे १७नोव्हेंबरच्या रात्री हा धक्कादायक गुन्हा घडला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने बिटरगाव पोलीसात तक्रार दिली आहे. पती दारु पिऊन घरी आला व त्यांच्या एका मित्राला फोन लावून देऊन तू त्यांच्याशी बोल, असा आग्रह त्याने धरला. पत्नीने बोलण्यास नकार दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर पतीच्या भीतीने त्याच्या मित्राशी ती फोनवर बोलली. त्यानंतर १७नोव्हेंबर रोजी सांयकाळच्या सुमारास पती सदर मित्राला सोबत घेऊन थेट घरातच दाखल झाला रात्री उशिरापर्यंत त्या दोघांनी येथेच्छ पार्टी झोडली. त्यानंतर मित्र वेगळ्या खोलीत झोपण्यासाठी गेल्यानंतर पतीने पत्नीला मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिने नकार देताच मारहाण मारहाण करीत तिला मित्राच्या रुममध्ये फरफटत नेऊन ढकलून दिले आणी स्वतः पतीने रूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. त्यानंतर पतीच्या मित्राने अत्याचार केल्याची तक्रार पिडीत महिलेने बिटरगाव ठाण्यात दिली त्यावरून या प्रकरणी वरील दोन्ही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या दोन तासात दोघांनही बिटरगाव पोलिसांनी अटक केली.
