
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे शिबिर रावेरी येथे 17 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या दरम्यान राबविण्यात आले. या शिबिराचा उदघाट्न सोहळा 18 तारखेला सीतामाता मंदिर या ठिकाणी पार पाडला. या उदघाट्न कार्यक्रमास रावेरी ग्रामपंचायत सरपंच राजूभाऊ तेलंगे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गजूभाऊ झोटिंग तसेच न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजय कचरे तसेच उपमुख्याध्यापक सुरेश कोवे,पर्यवेक्षक सूचित बेहरे उपस्थित होते.तर या कार्यक्रमाला गावातील प्रमुख पाहुणे म्हणून नितीन हिवरकर, वामनरावजी तेलंगे हे सुद्धा उपस्थित होते. रावेरी गावात राष्ट्रीय सेवा योजना विदयार्थ्यांनी गावातील श्रमदानामध्ये नाल्यावर बंधारा बांधला तसेच गावात दररोज ग्रामसफाई सुद्धा करून गावांमध्ये जनजागृती दिंडी काढली.अशाप्रकारे गावामध्ये सातही दिवस राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केला तसेच दुपारच्या बौद्धिक क्षेत्रांमध्ये महिला व्यसनमुक्ती अध्यक्ष ऍडव्होकेट सौं.वानोळे मॅडम या गावात उपस्थित होत्या. तर या शिबिराला राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन जाधव यांनी सुद्धा हजेरी लावली व त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय त्याचा काय उद्देश आहे मुलांनी यामधून काय घेतलं पाहिजे याबाबत सुंदर मार्गदर्शन त्यांनी केले. अशा प्रकारे सातही दिवस श्रमदान आणि बौद्धिक क्षेत्राच्या माध्यमातून मुलांचा अंतर्गत आणि बाह्य विकास करण्याचा प्रयत्न या शिबिरातून करण्यात आला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या यशस्वी शिबीरास न्यू एज्युकेशन सोसायटी, राळेगाव संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव डॉ सौं. अर्चनाताई धर्मे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक यांनी शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले आहे…
