न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , राळेगाव येथे दिनांक 1 मे ला महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न झाला. . या कार्यक्रमाचे वेळी सकाळी शाळेच्या मैदानावर तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान संस्थेच्या सचिव अर्चना धर्मे यांनी प्राचार्य मोहन देशमुख यांचे शाळेतील शैक्षणिक योगदान व कार्य लक्षात घेऊन त्यांचे हस्ते सकाळी 7.30 वाजता करण्यात आले , यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव सौं. अर्चना धर्मे,उपप्राचार्य प्रा. जितेंद्र जवादे, पर्यवेक्षक विजय कचरे , हे यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सूचित बेहरे यांनी करून महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले तसेच या कार्यक्रमाचे वेळी देशभक्ती गीतांचे गायन अनेक विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य मोहन देशमुख यांनी केले.या महाराष्ट्र दिन कार्यक्रमास शाळेतील विध्यार्थी,शिक्षक, प्राध्यापक, व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.