राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचाऱ्यांना शासनात विलीकरंन करून त्यांना राज्य शासनाचे कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा या व इतर काही मागन्यासाठी एस टी महामंडळाचे काही कर्मचारी राळेगाव आगरासमोर आंदोलन करीत आहे या आंदोलनाला तालुका भाजपचा पाठिंबा असून जिल्हा सरचिटणीस ऍड प्रफुल्लभाऊ चौहान यांचे नेतृवात भाजप पदाधिकारी यांनी नुकतीच या आंदोलनाला भेट दिली व त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या रा प म कर्मचारी यांचे विलीनीकरण राज्य शासनात करण्यात यावे यासाठी जिल्ह्यात आंदोलन सुरू करण्यात आले आहे राळेगाव येथे ही आंदोलन सुरू आहे राज्यात आजतागायत 31 एस टी च्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि समोर दिवाळीचा सण असल्याने त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहे त्यामुळे भाजपाच्या वतीने आम्ही सर्व भाजपा पदाधिकारी आपल्यासोबत आंदोलनात सहभागी आहोत असा विश्वास यावेळी चौहान यांनी कामचार्यांना दिला तसेच सर्व कामगार संघटनेच्या सदस्यांना घेऊन त्यांनी आगर प्रमुखाची भेट घेतली त्यांच्या समोर सर्व कर्मचाऱ्यांनी आपली बाजू मांडली आगार प्रमुखाणीही सर्व सहकार्य करण्यास तयार आहे असे सांगितले यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस ऍड प्रफुल्लभाऊ चौहान ,भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजनदादा कोल्हे, शहर प्रमुख डॉ कुणालभाऊ भोयर ,भाजपा तालुका सरचिटणीस अभिजीतभाऊ कदम, अनिलभाऊ राजूकर ,संजयभाऊ इंगळे, बबनराव भोंगारे,शुभमभाऊ मुके विनोदभाऊ महाजन,प्रवीणभाऊ शेलोटे,आकाशभाऊ कुळसंगे, आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.