खडकी वासीयांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन,सरपंच पदाचा दुर उपयोग करून जवळच्या लोकांना दिला घरकुलाचा लाभ

उपोषणाला बसणार असल्याची तक्रार केली दाखल

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

     

राळेगाव तालुक्यातील खडकी येथील रहिवासी अशोक नथ्थुजी वाभिटकर व शामसुंदर नानाजी खोंडे यांनी सरपंच, सदस्य यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य यांनी आपल्या पदाचा दुर उपयोग करून गरजु लोकांना डावलून जवळच्या लोकांना घरकुलाचा लाभ दिला आहे.तसेच सरपंच यांनी गावातून मंदिराकडे जाणाऱ्या सरकारी रस्त्यावर पक्के बांधकाम केले आहे. सरपंच यांनी आपल्या आईच्या नावे जागा नसताना तीला घरकुलाचा लाभ दिला आहे तसेच सरकारी गावठाण्यातील रस्ता ताब्यात घेतला आहे.तर सदस्य,सरपंच यांनी घेतलेला इंदिरा आवास योजनेतिल घरे, तसेच सरकारी रस्ता ताब्यात तसेच मुरमाचे अवैध उत्खनन करून घराचे फौडेशन भरले आहे तर आईच्या व भावाच्या नावाने कुठलाही आठ किंवा घर टँक्स नसून सुध्दा त्यांना घरकुलांचा लाभ दिला आहे. सदर सरपंच यांनी असे कृत्ये केले असल्याने त्यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी या करीता आम्ही संबंधित अधिकारी यांना निवेदन सादर करून दि.२० मार्चला खडकी ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसणार असल्याची माहिती अशोक नथ्थुजी वाभिटकर व शामसुंदर नानाजी खोंडे यांनी दिली. सौ. रंजना विजय नाहाते (सरपंच) खडकी महिला सरपंच असल्याने यांचे नाते आई माहेरचे नाव रंजना नागोराव पावडे असुन त्याचा भाऊ पांढरकवडा येथील रहीवासी असल्या मुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळु शकत नाही
तसेच सरपंच व सदस्यांनी कोणत्याही रस्त्याचे अतिक्रमण केले नाही.

सचिव ढगे
खडकी ग्रामपंचायत