धडाकेबाज कारवाईला सातत्याची किनार असू दया संवेदनशीलतेला कर्तव्यदक्षतेची जोड,

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

    सामान्य जनतेला पोलीस आपला मित्र वाटला पाहिजे,  गुन्हेगारप्रवृत्तीवर त्याचा वचक असला पाहिजे, पोलीस नियमावलीतील हे एक महत्वाचे कलमं. मात्र बहुदा सर्वसामान्य माणसाला येणारा अनुभव हा या उलट असतो. गुन्हेगारांना पोलिसांची भीती न वाटता जेव्हा सामान्यांनाच ती अधिक वाटायला लागते तेव्हा कुठेतरी पाणी मुरल्याचा वास हमखास यायला लागतो. मात्र काही कर्तव्यदक्ष अधिकारी याला अपवाद असतात.   कर्तृत्वाने एक वेगळी छाप पाडून जनतेचा ते विस्वास सम्पादन करतात तेव्हा त्या अधिकाऱ्यासह त्या विभागाची प्रतिमा देखील त्या परिसरात उंचावल्या खेरीज राहात नाही. वडकी ठाणेदार विनायक जाधव यांच्या बाबत सध्या नागरिकांच्या भावना याच स्वरूपाच्या आहेत. 
       सातत्याने वडकी पोलिसानी धडाकेबाज कारवाई करीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवरण्याचा जो एककलमी कार्यक्रम सुरु केला. तो कौतूकास पात्र ठरतांना दिसतो. याच आठवड्याचे उदाहरणं घेतल्यास 21 तारखेला गोवन्स तस्करांवर कारवाई करण्यात आली. लगेच 23 एप्रिल ला 2 ट्रॅक्टर पकडून रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याच दिवशी पल्सर मोटारसायकल ने अभिनव पद्धतीने दारू नेणाऱ्याला वडकी पोलिसानी जेरबंद करून पोलिसी हिसका दाखवला. 24 तारखेला अवैध देशी दारू नेणाऱ्या वाहनावर कारवाई करत तब्बल चार लाख त्र्यांशी हजार चारशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारानामध्ये जरब बसवण्यात आली. या मुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे चांगलेच दणाणले असले तरी जनतेत मात्र समाधान वेक्त होतांना दिसते. विशेष म्हणजे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत असतांना सामान्य नागरिकांप्रति वडकी पोलिसांनी अनेक वेळा जी संवेदनशील भूमिका बजावली ती अधिक महत्वाची ठरली. कोरोना काळात वडकी पोलिसांनी जनतेला मदतीचा हात दिला. उगीच पोलीसी खाक्या दाखवून जनतेला त्रस्त केले नाही. सामाजिक उपक्रमात पोलीस विभाग नेहमीच आघाडीवर राहिला या मुळे जनतेच्या मनात पोलिसांबाबत एक सकारात्मक भावना निर्माण झाली. कठोर कारवाई ने तीला अधिक वृद्धिंगत केले.  
       वडकी हे जिल्ह्यातील एक महत्वाचे ठाणे आहे. महामार्गावर असल्याने वडकी या ठिकाणी नेहमीच अपघात, तस्करी, अवैध दारू वाहतूक, गुन्हेगार प्रवृत्ती त्यातून उध्दभवणारे वाद सातत्याने सुरु असतात. ठाणेदार म्हणून रुजू झाल्यानंतर प्रथम दर्शनी अत्यंत मृदू स्वभावाचे वाटणारे ठाणेदार विनायक जाधव या ठाण्याला न्याय देऊ शकतील काय अशी शन्का उपस्थित करण्यात येतं होती. मात्र सज्जनांकरीता ' सदरक्षणाय '  व दुर्जनाकरिता  ' खलनिग्रहणाय ' असल्याचे त्यांनी दाखवून दिले. कर्तव्यकठोरते सोबतच सामान्य माणसाकरिता  संवेदनशीलता जोपासत त्यानी कामं केल्याने एक वेगळी ओळख या ठिकाणी त्यांनी निर्माण केली   आज वडकी सह तालुक्यातील जनतेला वडकी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईत सातत्य असावे अशी अपेक्षा आहे.