

राळेगाव ,(दि. १५ ऑगस्ट) :
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या दरम्यान संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले.
दि. १३ ऑगस्टला शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी येसेकर , १४ ऑगस्टला माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थीनीचे पालक मा. सुरेशराव उजवणे आणि १५ ऑगस्टला संस्कृती संवर्धन महिला संस्थेचे मा.कार्यवाहक श्री. संवर्धन एंबडवार यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला.
या निमित्ताने सायकल रॅली, प्रभातफेरी, शाळेत निबंध, वक्तृत्व, देशभक्तीपर गीत, चित्रकला आदी स्पर्धा तसेच देशभक्तीपर गीतावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
‘ हर घर तिरंगा ‘ हे अभियानात नागरिकांना सहभागी होता यावे म्हणून विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप केले. व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची प्रतिज्ञा केली.
या निमित्ताने तिरंगा घेऊन सायकल रॅली, व गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. तहसील कार्यालयात देशभक्तीपर गीत सादर केले. शाळेत निबंध, वक्तृत्व, चित्रकला, देशभक्तीपर गीत तसेच नृत्य इत्यादी उपक्रम घेण्यात आले. शाळेतील शिक्षक सीमा देशमुख, दिनकर उघडे , देवेंद्र मून, राकेश नक्षिणे , योगेश मिटकर, सलमा कुरेशी, ज्ञानेश्वरी आत्राम तथा भाग्यश्री काळे, विलास ठाकरे, अनंता परचाके, मुकुंद मानकर, प्रकाश अंबादे यांनी उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी अथक मेहनत घेतली. विद्यार्थी तथा पालकांनी यात उत्साहाने सहभागी घेत आनंद व्यक्त केला. शहरात सर्वत्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाने चैतन्य पसरले आहे.
