टिडीआर एफच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त जवानांकडून गरजूंना मेडिकल किटचे वाटप


तालुका प्रतिनिधी राळेगांव: रामभाऊ भोयर


टिडीआर एफला आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्य करत असताना ९ मे २०२१ रोजी १६ वर्ष पूर्ण झाले. दरवर्षी वर्धापन दिन (TDRF Day) हा सर्व टिडीआर एफ जवान एकत्रित येऊन साजरा करीत असतात.

परंतु यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्याने एकत्रित येऊ शकत नसल्यामुळे सर्वांनी आपापल्या तालुक्‍यांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा केला.


राळेगाव तालुक्यात शहरातील व नजीकच्या गावातील गरजू कुटुंबाना वर्धापन दिनानिमित्त टिडीआर एफचे संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात राळेगाव कंपनीतील जवानांनी १०० मेडिकल किटचे वाटप केले. त्या किटमध्ये मास्क, सॅनिटायझर , डेटॉल हँड वॉश, डेटॉल लिक्विड, डेटॉल साबण, बिस्कीट इ. आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

या उपक्रमासाठी टिडीआर एफ जनसंपर्क अधिकारी अभिषेक राजहंस कार्यरत होते. सोबतच या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कंपनी कमांडर ऋषिकेश डोंगरे,संजना राऊत, सहा.कंपनी कमांडर पायल येवले, प्रवेश पवार कंपनी ड्रिल इंस्ट्रक्टर अनिकेत वनस्कर, कंपनी सेक्शन कमांडर घनश्याम चुनारकर, शिल्पा सोयाम, अक्षय कोल्हे , गणेश कुळसंगे,आचलं सोनवणे,सतीश चौधरी,सारिका सोयाम या टिडीआर एफच्या जवानांनी कीट वाटपाचे विशेष कार्य केले. एवढेच नाही ही तर मागच्या वर्षीपासून’ आज पर्यंत टिडीआर एफच्या जवानांकडून कोरोना महामारीमध्ये मदत व सेवाकार्य करीत आहे तसेच प्रत्येक गावात कोविड १९ व लासिकरण संदर्भात जनजागृती करित आहेत. सदर सेवाकार्याची माहिती तहसिलदार राळेगाव रविंद्र कानडजे यांना दिली असता त्यांनी टिडीआर एफच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


मागील 16 वर्षापासून टिडीआर एफ नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीमध्ये राष्ट्रसेवा व नागरीसुराक्षेचे कार्य करीत आहे.