
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
कोरोणा महामारी चे संकट अजुन ही संपत नाही आज दोन वर्षे पूर्ण होत आहे आम्ही जगायचं कसं हा प्रश्न तयार झाला आहे ही झळ सहन करणं कठीण होतं आहे आणि कोरोणा महामारी पेक्षा “लष्करी शासन लॉकडाउण” मुळे दहशत निर्माण झाली ह्याचा फटका शेतकऱ्यांना सुध्दा बसला आहे.
शेतकरी कष्टकरी लोकांची कुचंबणा होत आहे अस्मानी संकटात शेतकरी हवालदिल झाला आहे बोंड अळी मुळे उत्पन्न कमी झाले आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकार ने नुकसान भरपाई दिली नाही आणि आता पेरणी चा हंगाम आला आहे शेतकऱ्यां जवळ पैसा नाही म्हणून सरकार ने बि-बियाने घेण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे
अल्पभूधारक शेतकरी मोठे शेतकरी यांना कीमान २५०००/₹ सरसकट मदत सरकार ने केली पाहिजे नाहीतर बि-बियाने मोफत दिले पाहिजे सरकार ने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे नैराश्य ग्रस्त शेतकऱ्यांना समुपदेशन आणि शेती करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे असे मत ग्राम स्वराज्य महामंच चे अध्यक्ष.मधुसुदन कोवे यांनी व्यक्त केले आहे.
