
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
नाशिक येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२१ येथे राळेगाव आदिवासी बहुल तालुक्यातील आटमुर्डी येथिल कवी निलेश दिगंबर तुरके यांच्या कवितेला सादरीकरणाचा मान मिळालेला आहे.
दि. ३,४,५ डिसेंबर २०२१ ला आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील “कविकट्टा” या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी कवी निलेश दिगंबर तुरके यांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या “परतीचा पाऊस” या कवितेची सादरीकरणासाठी निवड झाली आहे.
या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डाॅ जयंत नारळीकर हे असून स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री ना.मा.छगनजी भुजबळ आहेत. हे संमेलन आडगाव येथिल भुजबळ नाॅलेज सिटी काॅलेजच्या आवारात होणार आहे.यवतमाळ ,उस्मानाबाद आणि आता नाशिक येथे सलग तिसऱ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी निलेश तुरके ची निवड झाल्यामुळे आप्तपरिवार, मित्रपरिवार आणि साहित्यक्षेत्रातही जल्लोषाचे वातावरण आहे.
