
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
श्री उमेश लक्ष्मण शेडमके रा जळका ता राळेगाव यांनी हरीश गडदे यांचे भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र राळेगाव मध्ये नोव्हेंबर 2021 ला 330 v 12 रू चा वार्षिक विमा मध्ये 200000/ नैसर्गिक मृत्यू चा विमा काढला होता,परंतु त्यांचा फेब्रुवारी 2022 ला अचानक मृत्यू झाला, व त्यांनी sbi Life insurance CHA 5000/ वार्षिक स्वधन म्हणून प्लॅन काढलेला होता हे शाखा व्यवस्थापक श्री पंकज पांगारकर यांचे लक्षात येताच त्यांनी सर्व कागदपत्र ची पूर्तता करून उमेश यांची फाईल sbi life insurance Yavatmal येथे त्यांचे सर्व कागदपत्र पाठवले व अवघ्या 7 दिवसात उमेश यांचे वारसाचे खाते मध्ये क्लेम जमा झाला.
श्री पंकज पांगारकर व हरीश गडदे यांचे सतर्कतेमुळे आज उमेश चे वारसाला लवकरात लवकर रक्कम मिळण्यास मदत झाली.
आपल्याकडे असे काही झाल्यास कृपया शाखेशी संपर्क करावा.असे आव्हान शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे.
