करंजी (सो) येथील तरुण तडफदार सरपंच प्रसाद भाऊ ठाकरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा जि.प.उपाध्यक्ष मा.बाळासाहेब पाटील कामारकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष मा.राहुल भाऊ काणारकर यांच्या नेतृत्वात करंजी ( सो ) येथील सरपंच मा.प्रसादभाऊ ठाकरे यांच्या राळेगाव तालुक्यातील कार्याचा आढावा घेऊन,भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युवकांचा भक्कम सहभाग असावा या अपेक्षेने मा.प्रसाद ठाकरे यांची राळेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे समस्त जिल्हा कार्यकारिणी व समस्त तालुका अध्यक्ष उपस्थित होते.