सौ.प्रितीताई सोनूलकर याना प्रभाग क्र,8 मधून शिवसेनेची उमेदवारी देण्याची जनतेची मागणी

दिग्रस तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

दिग्रस येथील शिवसेनेचे निष्ठावत युवा कार्यकर्ते नितीन सोनूलकर याना कुठलाही राजकीय वारसा नसताना पक्ष श्रेष्टीचे वेळोवेळी आदेशाचे पालन करणारे एक कट्टर शिवसैनिक आमदार संजय राठोड याना सर्वस्वी मानणारे शिवसैनिक तथा विभाग प्रमुख यांनी अल्पावधीतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात झेप घेतली.त्याच्या पत्नी सौ.प्रीती नितीन सोनूलकर ह्यांना दिग्रस शहरातील प्रभाग क्र.8 मधून लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळावी. अशी प्रभाग क्र.8 मधील युवा,व महिला वर्गाची अपेक्षा आहे.
कोरोना काळात आमदार संजय राठोड यांचे कडून आलेली मदत वस्तू व सॅनेटायझर कुठलीही भीती न बाळगता घरोघरी जाऊन वाटप,व शहरात आलेल्या पुरात सुध्दा पत्नीला सोबत घेऊन सामाजिक कार्यात वेळोवेळी हजर राहून निष्ठेने काम करणाऱ्यां तथा सोशल मीडियावर विरोधकांवर प्रसंगी आपल्या लेखणीतून तुटून पडणारे नितीन सोनूलकर यांच्या अर्धगिनी प्रिती ताईस संधी देण्याची मागणी होत आहे.