तलावात बुडून युवकाचा मृत्यू,वडकी पो,स्टे अंतर्गत डीगडोह येथील घटना

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव तालुक्यातील वडकी पो,स्टे अंतर्गत येत असलेल्या मंगी शेतशिवारातील एका तरुण युवकाचा डिंगडोह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि 7 जुलै रोजी दुपारी 12,30 च्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असं की दहेगाव येथील अजय गजानन तोडसाम वय वर्ष 18 हा गावातील मुलासोबत मंगी शेतशिवारात असलेल्या डिंगडोह तलावात अंघोळ करण्याकरिता गेला होता,तलावात अंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज माहीत नसल्याने अजय तोडसाम हा खोल पाण्यात जाऊन गाळात फसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही बाब गावकऱ्यांना माहिती होताच तलावाजवळ प्रचंड गर्दी केली,गावकऱ्यांनी तलावात अजयचा शोधाशोध केला असता सुमारे दोन तासानंतर अजयचा मृतदेह हाती लागला घटनास्थळी तात्काळ वडकी पो,स्टे चे कर्मचारी रमेश आत्राम सह मेश्राम यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविण्यात आले याप्रकणी पुढील तपास वडकी पो,स्टे करीत आहे