वडकी येथील ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरु करा:ग्रामस्थांची मागणी


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगांव: तालुक्यातील वडकी
येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे,गेल्या अनेक महिन्यांपासून वडकी येथे शासकीय ग्रामीण रुग्णालय मंजूर तर झाले पण त्या रुग्णालयाचा तिढा जागेअभावी अजूनही कायम आहे,त्यामुळे वडकी येथील मंजूर झालेले रुग्णांलय फक्त कागदोपत्री पडून आहे.रूग्णालयाच्या जागेचा प्रश्न सोडवून बांधकाम सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.यासाठी दिनांक २८ जुलै रोजी
वडकी येथे बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे. याबाबत वडकी पो,स्टे चे ठाणेदार विनायक जाधव यांना आज गुरुवारला निवेदन सुद्धा देण्यात आले आहे निवेदन देतेवेळी सचिन किन्नाके,शरद सराटे,राजेंद्र देठे, नरेंद्र झिले,किरीट तन्न
उपस्थित होते.