क्रांतिकारी शामादादा कोलाम यांची जयंती समाजा मध्ये वैचारिक उद्बोधन करून साजरी केली पाहिजे – मधुसूदन कोवे

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)

२६ नोव्हेंबर आदिम जमाती मधिल क्रांतिकारी युगपुरुष शामादादा कोलाम यांची जयंती कार्यक्रम राळेगाव तालुक्यातील सराटी या गावात साजरी करण्यात आली होती.आदिम कोलाम समाजातील लोकांना वैचारिक उद्बोधन करून शिक्षण आणि समाजकारण या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच प्रमुख उपस्थिती मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.रमेश खन्नी सामाजिक कार्यकर्ते कोलाम समाज आणि विष्णुभाऊ उईके यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्याची जाणीव ठेवून आदिम जमाती कोलाम समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते

शामादादा कोलाम यांच्या जिवन कार्यावर मार्गदर्शन करताना मा.मधुसुदन कोवे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सांगितले की आपला समाज उपेक्षित आणि वंचित आहे राजकीय पुढारी दलाल आहेत ही मानसं मतासाठी “मुठभर चिवडा आणि घुटभर दारु ” साठी समाजातील लोकांना व्यसनाधीन करून अज्ञानाचा फायदा घेत आहे. म्हणून अशा समाज कंटक व्यक्ती पासून लोकांनी सावध राहीले पाहिजे.असे मत व्यक्त केले आहे.सराटी येथिल आदिम जमाती कोलाम समाजातील लोकांनी ठरवले आहे की या पुढं शामादादा कोलाम यांची जयंती ” सामाजिक प्रेरणा दिन” म्हणून साजरा करु. आजच्या जयंती निमित्त प्रविण सुभाष वड्डे, वाल्मिक घोडाम रामाजी आतराम लक्ष्मण खोरद मारोतराव शिरबंदी कवडुजी मेश्राम हणुमान शिरबंदी कवडुजी येलके दमडुजी आतराम गुलाबराव टेकाम गौतम पाटील सुनील शिरबंदी यांच्या सहकार्याने जयंती साजरी करण्यात आली आहे.