
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ अंतर्गत इंडीयन इंस्टिट्युट ऑफ युथ वेल फेअर राळेगांव येथे कृषी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. हरीत क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली. यावेळी मान्यवरांचे हस्ते अनेक झाडे लावण्यात आली आहे..
यावेळी पी.डी.मेंडूलकर,किशोर जुनूनकर,प्राचार्य आर.ए.ठाकरे,डाँक्टर प्रतीक बोबडे,के.टी.ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.एस.सी.ॲग्रीकल्चर सातव्या सेमिस्टर ची विद्यार्थिनी साक्षी ज्ञानेश्वर थूटे हिने नाईक साहेबांच्या शेतातील योगदाना बाबत माहिती देत कार्यक्रमाचे संचलन,तर आभार प्रदर्शन शीतल वासूदेव तोटे हिने केले…
