कीन्ही जवादे ग्रामपंचायत येथे आरोग्य सेवा कॅंप संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


दिनांक २३/८/२२रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहकार्याने आरोग्य तपासणी व औषधोपचार कॅंप घेण्यात आला.
सद्यस्थितीत वातावरण बदलामुळे व्हायरल फीव्हर,ताप, सर्दी खोकला यांची साथ आहे.शेतीचे कामाचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना बाहेर गावातील दवाखान्यात जाणे शक्य होत नाही.ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे कर्तव्यदक्ष सरपंच सुधीर भाऊ जवादे, उपसरपंच रमेश तलांडे, सदस्य प्रसाद निकुरे प्रतिभाताई मोहुर्ले सुषमाताई जवादे सिमाताई ऊईके मालाताई लोणबले सचीव सुनील येंगडे, कर्मचारी पुंडलिक लोणबले, मारुती ईठाळे, धनराज तोडसाम आशावर्कर सुशीलाताई मेश्राम यांनी आरोग्य तपासणी व औषधोपचार कॅंप आयोजित केला.दहेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रेवती साठोणे,एच बी बोरपे,ताकसांडे मॅडम यांनी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली.