ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे मदत कक्ष व संपर्क सेतू चे उदघाटन


राळेगांव तालुका प्रतिनिधी :- रामभाऊ भोयर (9529256225)

लोकहीतमहाराष्ट्र व्हाट्सअप्प ग्रुप राळेगाव ला जॉईन करा

https://chat.whatsapp.com/LxTeSXkCdRO0LxBSA9SlKJ


आपल्या सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा-सुविधा आणि योजना ई. विषयक सल्ला व मार्गदर्शना करिता मदत कक्ष व संपर्क सेतू चे उदघाटन डॉ. भीमरावजी कोकरे सदस्य रुग्ण कल्याण नियामक समिती व डॉ. प्रकाश चिमणानी वैद्यकीय
अधिक्षक यांचे हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भवा मुळे राज्य भरात निर्मान झालेल्या परस स्थितीला आपण सगळेच जन सामोरे जात आहोत त्यात सरकारी आरोग्य यंत्रना अहोरात्र काम करीत आहे. सध्या महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता राळेगाव रुग्नालयामधे सर्व दक्षता घेऊन पुढील काही महिन्या करिता मदत कक्ष सुरू केला असल्याची माहिती गजानन डाखोरे संचालक यानी प्रास्ताविकातून दिली.
तसेच ग्रामीण रुग्णालयात रोज येणार्या रुग्णांना आरोग्य विषयक योजनांची पुर्णपणे माहिती मदत कक्षा मार्फत देण्यात येइल सोबतच योजना मिळउन घेण्यासाठी लागणार्या माहितीची देवाण घेवाण आणि तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपर्क आमच्या आऊट रिच कार्यकर्त्या मार्फत नियमित ठेवणार आहोत. स्थानिक संस्था संघटनांच्या मदतीने गावातील बाधितांची वेळीच दखल घेऊन जिल्हा प्रशासनास कळविने ई. बाबिचे नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न करनार आहोत असे माधुरी खडसे यानी आपल्या मनोगतातून सांगितले.
याप्रसंगी वर्षाताई बन्गाले समुप देशक, अन्गदा कावळे डॉ. भीमराव कोकरे, डॉ. प्रकाश चिमणानी यानी मनोगत व्यक्त करुन मदत कक्षा ला शुभेच्छा दिल्या,
या कार्यक्रमाला डॉ.तृप्ती डुकरे, शिल्पा राठोड. एस. जवादे, पी. गेडाम, ए. झान्जदे, एस.बी.रिठे, संघमित्रा थूल, गजानन कोल्हे उपस्थीत होते.