
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात येत असलेले धानोरा येथील प्रवीण सुरेश वाघ वय 35 वर्षे यांनी काल दि 22/07/2022 रोजी विषारी कीटक नाशक प्राशन केले त्यानंतर त्यांना थेट यवतमाळ येथील वसंतराव नाईक रुग्णालय येथे नेण्यात आले व आज 23/07/2022 रोजी ला आपली जीवन यात्रा संपवली अजून आत्महत्येचे कारण समजले नसून सततच्या पावसामुळे शेतातील झालेले नुकसान व असलेले कर्ज याला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजत आहे त्याच्या मागे बराच आप्त परिवार असून मुलगा 2 वर्ष, मुलगी 1 वर्ष, पत्नी, वडील,आई व भाऊ असा परिवार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
